आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका : ओबीसींचा मोर्चा

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसी आरक्षण संरक्षण कृती समितीच्या वतीने ओबीसीच्या मूळ आरक्षणाला सरकारने धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सरकारच्या निषेधार्थ देवणी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता.
मराठा समाजाला दिलेले आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात यावे. ओबीसीच्या सर्व आर्थिक महामंडळाना भरीव निधीची तरतूद करावी, ओबीसीचा बॅकलॉग भरून काढावा, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, लिंगायत समाजाचा अल्पसंख्याक दर्जा मान्य करून धर्ममान्यता द्यावी, धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी त्वरित मंजूर करावी इ. मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रा. सुभाष भिंगे हे उपस्थित होते.

या वेळी प्रा. धनेश टिळे, ॲड. गोपाळ एस. बुरबुरे, ॲड. राजेश खटके, ॲड. विठ्ठल आदित्य, भारिपचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, प्रा. नरसिंग सूर्यवंशी, अशोक चव्हाण, दिलीप तपसाळे, डी. एम. बोरूळे, संतोष म्हेत्रे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष, फयाज शेख, भारिप तालुकाध्यक्ष व्यंकट सूर्यवंशी, संतोष म्हेत्रे, अन्यथा अत्याचार कृती समितीचे अध्यक्ष मोमीन, महिला अध्यक्ष रंजना पोलकर, बाळासाहेब म्हेत्रे, सुभाष नागुरे, अनंत काळे, मधुकर कांबळे, पांडुरंग कांबळे, कल्याणकर बिरू, दत्ता चाळकापुरे, शिवाजी कापडे, काशीनाथ कोनाळे, बालाजी बोरूळे, गोविंदराव म्हेत्रे, शिवाजीराव शिंदे व देवणी निलंगा, उदगीर, तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चाचे आयोजन ॲड. विठ्ठल आदित्य यांनी केले होते.