बहिरेपणाकडे द्या वेळीच लक्ष, अन्यथा उद्भवू शकतात अनेक समस्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लहान मुलांमधील बहिरेपणाकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. वयाच्या ५ ते ६ वर्षांपर्यंत मुलांमधील बहिरेपणा कळून येत नाही. त्यानंतरही निदान आणि उपचार झाले नाहीत, तर मुलांच्या बोलण्यावरही परिणाम होतो. अनेक रुग्णालयात नवजात बालकांच्या कानाची तपासणी करण्यासाठी ओएई श्रवणचाचणी आहे. ही चाचणी संबंधितांनी वेळीच करून घेतली पाहिजे. पालकांनीही मूल आवाजाला कसा प्रतिसाद देते याकडे लक्ष पाहिजे. ज्या मुलांच्या बोलण्याचा विकास उशीरा होत, त्यांना ऐकण्याची समस्या असू शकते.
गरोदरपणात इन्फेक्शन झाल्यासही बाळाच्या कानाची समस्या निर्माण होऊ शकते. सातत्यानं होणारं नाक आणि घशाचं इन्फेक्शन, इअर बड किंवा कोणतीही वस्तू कानात घातल्यानं कानाला दुखापत, डोक्याला दुखापत, कानाचं इन्फेक्शन यामुळेही बहिरेपणा उद्भवू शकतो. तसंच खोल पाण्यात गेल्यानं कानावरील दाबावर परिणाम होतो. तसंच मधुमेह, टीबी, गोवर, व्हायरल इन्फेक्शन, हायपरटेंशन, थायरॉईडचे आजार या गोष्टीही बहिरेपणाला कारणीभूत ठरतात.
विकसनशील देशांमध्ये लहान मुलांचे आणि प्रौढांमध्ये दिसून येणारे कानाचे आजार आणि ऐकू न येण्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. भारतात सामान्यपणे ओटिटिस मीडिया ही कानाची समस्या दिसून येते. वारंवार होणाऱ्या नाक आणि घशाच्या इन्फेक्शनमुळे कानाचा हा इन्फेक्शन उद्भवतो. यामुळे कानाच्या पडद्यावरही परिणाम होतो. जर त्यावर उपचार झाले नाहीत तर त्याचे गंभीर असे दुष्परिणाम होऊ शकतात. औषध आणि शस्त्रक्रियेनं हे इन्फेक्शन बरं करता येतं
वाढत्या वयानुसार वयाच्या पन्नाशीनंतर बहिरेपणाची समस्या उद्भवते. अशा वेळी मशीन लावून ही समस्या दूर करता येते. मात्र काही गैरसमजुतीमुळे अनेक लोकं मशीन लावणं टाळतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्य किंवा मित्रपरिवाराशी त्यांच्या संवाद कमी होतो. हळूहळी ते डिप्रेशनमध्ये जातात. बहिरेपणा हा जन्मत किंवा नंतरही येऊ शकतो. दोघांचंही निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करता येतात. जगातील ३६० दशलक्ष लोकांना बहिरेपणा आहे. म्हणजेच जवळपास ५.३ टक्के लोकांना ही समस्या आहे. कानाच्या समस्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे, मात्र त्याला प्रतिबंध करता येणं शक्य आहे. त्यामुळे कानांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.