मराठा क्रांतीमोर्चाचा उपयोग पक्ष बांधणीसाठी नको

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा क्रांती मोर्चाचे नाव वापरून राजकीय पक्ष सुरू करण्याची घोषणा करण्यात येत आहे. याची दखल घेत मराठा क्रांती मोर्चाची तातडीची बैठक औरंगाबादमधील टीव्ही सेंटर, हडको परिसरात घेण्यात आली. यावेळी समन्वयकांनी आपली मते नोंदविली. मराठा क्रांतीमोर्चाचा उपयोग पक्ष, संघटना बांधणीसाठी नको, असा ठराव बैठकीत घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चा हे नाव समाजाची आस्था असून सामाजिक एकता आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठीच हे नाव वापरावे. वैयक्‍तिक, पक्ष, संघटना बांधणीसाठी कुणी वापर करताना आढळल्यास समन्वयक आणि समाज त्यांना रोखठोक उत्तर देतील, असा ठराव समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीला प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, अंकत चव्हाण, विजय काकडे, प्रदीप हारदे, रामेश्वर राजगुरे, बाळासाहेब औताडे, संदीप सपकाळ, रमेश गायकवाड, अ‍ॅड. सुवर्णा मोहिते, सुनील कोटकर, शिवाजी जगताप, प्रशांत शेळके, योगेश औताडे, सतीश वेताळ आदी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07437YHXP,B079GXD2WB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22b3b383-ba42-11e8-bf9d-4b2f3b5b60b6′]
मराठा क्रांती किंवा सकल मराठा या नावाने कुणी पक्ष काढत असेल तर, होणाऱ्या परिणामांना ते स्वत: जबाबदार राहतील. मराठा क्रांती ही समाजाची आस्था आहे. ज्या वेळेस सामाजिक एकता, अन्यायाविरुद्ध लढा उभारायचा असेल त्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा ताकतीने ते आंदोलन उभे राहील. त्याचा उपयोग कुणीही वैयक्तिक कामासाठी किंवा पक्ष, संघटना बांधणीसाठी करू शकत नाही. असे काही आढळल्यास मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी रोखठोक पद्धतीने उत्तर देतील, असा एकमताने ठराव यावेळी घेण्यात आला.

आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे भाजपला मदत करतील