दुसर्‍याच्या ‘या’ 6 वस्तू वापरल्यामुळं वाढते ‘आर्थिक’ अडचण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपत्तीत भरभराट व्हावी असे कोणाला वाटत नाही. परंतू अनेकदा नकळत आपण काही चूका करुन बसतो ज्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला वाटतेय की तुमचे नुकसान होऊ नये तर प्रयत्न करा की तुमच्या ‘शंख लिखित स्मृती’त ज्या 6 वस्तू दुसऱ्यांकडून घेणास नकार दिला आहे त्या कोणाकडूनही मागणे टाळा.

ज्या व्यक्ती दुसऱ्याचे धन घेतात त्यांच्याकडे लक्ष्मी निवास करत नाही, कारण दुसऱ्यांच्या संपत्तीतून भोगाची इच्छा ठेवणाऱ्यांकडे धर्म नसतो आणि जेथे धर्म नसतो तेथे लक्ष्मी निवास करत नाही.

1) शंख स्मृतिमध्ये सांगितले आहे की दुसऱ्यांच्या अंथरुणात झोपणे योग्य नाही. जे दुसऱ्यांच्या अंथरुणाचा वापर करतात त्यांच्याकडे लक्ष्मी निवास करत नाही.

2) दुसऱ्याचे वस्त्र मागून ते परिधान करणे तुमच्यासाठी समस्या निर्माण करणे ठरेल.

3) दुसऱ्यांकडून खाण्याच्या विचारात राहून नका, दुसऱ्याचे जेवण खाणारा व्यक्ती धन, संपत्तीबाबत सुखी नसतो. सुदामाने कृष्णाच्या हिशाचे अन्न खाल्ले, ज्याचा परिणाम हा झाला की त्याला गरिबीत जगावे लागले.

4) परस्त्री बरोबर नाते ठेवणे संकटकारी असून संपत्तीसाठी हानिकारक आहे.

5) मैत्रीत काही लोक दुसऱ्यांची वाहने मागतात. शंख स्मृतीमध्ये सांगण्यात आले आहे की असे करणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. यामुळे स्वत:च्या संपत्तीत, धनात कमी येते.

6) नेहमी प्रयत्न करा की स्वत:च्या घरात रहा, दुसऱ्यांच्या घरात राहणारे कधीच आपले धन टिकवू शकत नाही.

Visit : Policenama.com