‘डुप्लिकेट नको, ओरिजिनल भैया पाहिजे’ ! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – “झालेला प्रकार विसरलो नाही… आम्ही, आया बहिणींच कुंकू पुसणारा नकोय… आया बहिणींचं रक्षण करणारा पाहिजे… डुप्लिकेट नको, ओरिजिनल भैया पाहिजे …. “अशा आशयाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केडगाव हत्याकांडाशी साधर्म्य सांगणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियाचा वापर सर्व राजकीय पक्ष आणि नेते करीत आहेत. शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा प्रचार नगर शहर मतदारसंघात शिगेला पोचला आहे. त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले. शिवसेनेची जाहिरात करणारे हे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये हे व्हिडीओ धुमाकूळ घालत आहेत. प्रत्येक निवडणुकीत सोशल मीडिया एक हत्यार म्हणून वापरले जाते. तरुणाईला साद घालण्यासाठी हे एक सोप्पे माध्यम आहे. त्याचा खुबीने वापर केला जात आहे.

तरुणांच्या रोजगारासंबंधात भाष्य करणारा अजून एक व्हिडीओ प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. “निवडणुकीच्या तोंडावर खोट्या कंपन्या उभारून नोकरीचं आमिष दाखवणारा नको… खरंच तरुणांना रोजगार देणारा पाहिजे…. डुप्लिकेट नको; ओरिजिनल भैया पाहिजे…” नगर शहरात आयटी पार्क हा मुद्द्दा देखील निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. त्यावर एकतर्फी भाष्य करणारा आणि पडद्याआडून टीका करणारा हा व्हिडीओ शिवसेनेने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे, असे व्हिडीओ व्हायरल करून ओरिजिनल आणि डुप्लिकेट भैय्या असा कलगीतुरा रंगवला जात आहे आणि त्याद्वारे मतदारांना साद घातली जात आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्यात नगरमध्ये दुरंगी लढत होत आहे. हा मतदारसंघ देखील राज्यातील महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो. कोण ओरिजिनल आणि कोण डुप्लिकेट हे जनता ओळखून आहे. पण या व्हिडीओंनी मात्र सोशल मीडियावरचे राजकीय मैदान चांगलेच तापवले आहे.. असे असले तरी कोण डुप्लिकेट आणि कोण ओरिजिनल हे मात्र २४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी