‘छत्रपतीं’चे स्थान ‘मनात’ कायम, आम्हाला ‘वारसांच्या’ वादात पडायचे नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात सुरु असलेला वाद आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशंजापर्यंत जाऊन पोहचला आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकाचा निषेध करण्यात आला. यानंतर राजकीय पक्षांमध्ये आणि छत्रपतींच्या वशंजामध्ये तू तू मै मै होताना पहायला मिळत आहे. उदयनराजे यांनी छत्रपतीचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत या संजय राऊत यांच्या विधानावरून राज्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. याचसंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला या वादात पडायचे नसल्याचे म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं स्थान आमच्या मनात कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या भांडणात आम्हाला पडायचं नाही. राजकीय पक्षांच्या भांडणातही आम्हाला पडायचं नाही, पॉलिटीकल स्कोर आम्हाला करायचा नाही, असे त्यांनी सांगितले. जाणता राजा ही पदवी लोकांनी शिवाजी महाराजांना दिली आहे. लोकांनी हे मानलेलं आहे. रयतेचा राजा म्हणून लोकांनी शिवाजी महाराजांना मानलेलं आहे, तेच आम्हाला महत्त्वाचं असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यसभेचे तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे भोसले यांनी लोटांगण घातले आहे. असा टोला नवाव मलिक यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक बोलत होते. ते म्हणाले, देशात गादीचे वारस असलेले आणि रक्ताचे नाते असलेले अनेक राजे आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे हे महाराजांचे गादीचे वारस आहेत की, रक्ताचे वारस आहेत. असा सवाल राऊत यांनी उपस्थित केले आहेत. आता उदयनराजे यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावीत, असे मलिक म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/