आम्ही येथे 500 घरे बांधणार आहोत,आम्हाला कोणतंही श्रेय नको नाना पाटेकरांनी घेतली कोल्हापूरकरांची भेट

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेते नाना पाटेकर यांनी आज कोल्हापुरातल्या शिरोळमध्ये लोकांची भेट दिली. शिरोळमध्ये ५०० घरं बांधणार असल्याचं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. काळजी करु नका सगळं काही नीट होणार आहे असं आश्वासन अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलं.
शासनाने काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देतो आहे. मी जे करतोय त्याच मला कोणतंही श्रेय नको, जे काही करतोय ते आपण सगळे करतो आहोत असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

पद्माराजे विद्यालयात नाना पाटेकर यांनी काही पूरग्रस्तांची भेट घेतली. शिरोळमध्ये आलो आहे इथे आता काही घरे बांधायची आहेत परंतु आम्हाला कोणतेही श्रेय लाटायचे नाही. प्रत्येकाने आपला वाटा उचलायाचा आहे, आत्ताही अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु आहे. मी मदत करणार म्हणजे काय ? तर मीदेखील झोळी घेऊन लोकांकडेच पैसे मागणार लोक देतात त्यांना विश्वास वाटतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे.

शासनाने सगळं काही केलं पाहिजे असं आपण म्हणतो पण शासन म्हणजे कोण ? तर सरतेशेवटी माणसंच ना ? आपण सगळ्यांनी मिळून या आपत्तीला तोंड दिलं पाहिजे आपण देतो आहोत त्यामुळे रडायचं नाही असंही नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

कोल्हापुरमधील पुरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेकर सांगलीकडली परिस्थिती जाणून घेण्यासाठी सांगलीला जाणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like