‘मतदान कार्ड’ नाही मग ‘नो-टेन्शन’, ‘या’ कागदपत्रांच्या आधारे ‘व्होटिंग’ करू शकता, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला आहे. 21 ऑक्टोबर रोजी सर्वत्र मतदान होणार आहे. जर मतदान करताना तुमच्याकडे भारतीय निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल तर पुढील 11 कागदपत्रांच्या सहाय्याने म्हणजे आयोगाने ग्राह्य धरलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून तुम्ही मतदान करू शकता.

https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/AC2019/IdentityCardProofAC2019.pdf

1) वाहन चालक परवाना
2) पारसोर्ट
3) पॅनकार्ड
4) मनरेगा जॉबकार्ड
5) कामगार मंत्रालयाने दिलेलं आरोग्य विमा स्मार्टकार्ड
6) फोटो असणारं बँकेचं किंवा टपाल कार्यालयाचं पासबुक
7) फोटो असणारं कर्चमचारी ओळखपत्र(राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)
8) आधारकार्ड
9) खासदार/आमदार/ विधानपरिषद सदस्य यांना दिलेलं ओळखपत्र
10) फोटो असणारं निवृत्तीवेतन दस्तऐवज
11) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक(रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारा मिळालेलं स्मार्टकार्ड

visit : Policenama.com

Loading...
You might also like