‘त्यांनी’ पोलिसांच्या समोरच मंत्रालयाच्या गेटवर का ‘दुध’ फेकलं (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकोनॉमिक पार्टनरशिप कराराला विरोध करुन आज मंत्रालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध फेको आंदोलन केले आहे. या आंदोलनामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. थायलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहे. हा करार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप आहे.

आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागिदारी असेलेले भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकोनॉमिक पार्टनरशिप या व्यापार विषयक करारावर सोमवारी सह्या करण्यात येणार आहे. यावेळी भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅंकॉक येथे बैठकीला उपस्थित राहणार आहे.

या करारातील तरतुदी भारतीयांच्या मुळावर येणार आहे. दुधासोबत अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करणार आहे आणि त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. भविष्यात शेतकरी अडचणीत येणार आहे. त्यामुळे या करारावर भारताने सह्या करु नये, अशी विनंती जनता दल त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

Visit : Policenama.com