दूरदर्शनच्या प्रसिध्द ‘अँकर’ आणि ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्राप्त नीलम शर्मांचे कॅन्सरच्या विकाराने निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दूरदर्शनच्या प्रसिध्द अँकर नीलम शर्मा यांचे शनिवारी निधन झाले आहे. दूरदर्शनने याबाबतचे ट्विट आपल्या आधिकृत ट्विटर हॅडेलवरुन केले. नीलम शर्मा या कॅसरने पीडित होत्या. नीलम शर्मा या दूरदर्शनवरुन प्रसिद्ध चेहरा आहेत.

मागील २० वर्षापासून त्या दूरदर्शनसाठी कार्य बजावत होत्या. त्यांना याचवर्षी मार्च महिन्यात नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात दूरदर्शनमधून १९९५ मध्ये केली.

दूरदर्शनच्या ट्विट वर लिहिले आहे की, डीडी न्यूजच्या वरिष्ठ एँकर नीलम शर्मा यांचे आकस्मित निधन झाल्याने दूरदर्शन परिवाराकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नारी शक्ती सन्मान सारख्या पुरस्कारांने सन्मानित नीलम शर्मा यांनी आपल्या २० वर्षांपेक्षा अधिकच्या कार्यकाळात ‘तेजस्विनी’ पासून ‘बडी चर्चा’ इत्यादी लोकप्रिय कार्यक्रमाचे संचालन केले. आज संध्याकाळी ६ वाजता निगम बोध घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like