Doordarshan Movie Review : ‘स्मार्टफोन’च्या जगात ‘दूरदर्शन’चा काळ जिवंत करतो सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  दूरदर्शन हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला आहे. तुम्हाला सरप्राईज करेल असाच हा सिनेमा आहे. कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही तरीही हा सिनेमा खूप काही चांगलं देईल असं दिसत आहे. जर तुम्ही 80 आणि 90 च्या दशकातील किड असाल तर तुम्हाला हा सिनेमा तुमच्या जुन्या दिवसांची आठवण नक्की करून देईल.

सिनेमाची स्टोरी दिल्लीतल्या एका कुटुंबाची आहे ज्याचा प्रमुख आहे. सुनील(मनु ऋषी चड्ढा) ज्याचं आपल्या आईवर खूप प्रेम आहे. त्याच्या घरातील एक वृद्ध महिला (डॉली अहलूवालिया ) आहे जी 30 वर्षांपासून कोमात आहे. त्याची पत्नी प्रिया (माही गिल) त्याला सोडून वेगळं रहात असते. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा कॉलेजला वैतागला आहे आणि अ‍ॅडल्ट पुस्तकं वाचायला लागला आहे. एकदा अचानक त्या वृद्ध महिलेला शुद्ध येते. तिला वाटतं की, सगळं 30 वर्ष जुनचं सुरू आहे. इथून खरी परेशानी सुरू होते. यानंतर सगळं कुटुंब 30 वर्ष जुनी लाईफ दाखवायला सुरु करतात जेव्हा दूरदर्शन होतं. मग यात सुरू होते कॉमेडी.

अभिनेता मनु ऋषी चड्ढाचा कॉमेडी टायमिंग कमाल आहे. त्यांना सोबतच्या कलाकारांनीही चांगला सपोर्ट केला आहे. डायरेक्टर गगन पुरी यांनीही स्टोरी कधी इकडे तिकडे अजिबात होऊ दिली नाही. तुम्हाला हा कॉमेडी ऑफ एरर वाला अंदाज आणखी चांगला वाटेल. या सिनेमातील वनलाईनर देखील खूप चांगले आहेत. राजेश शर्मा, डॉली अहलूवालिया, शार्दुल राणा, सुमित गुलाटी, सुप्रिया शुक्ला हे ते कलाकार आहेत ज्यांनी वेगवेगळ्या सिनेमात काम केलं आणि चाहत्यांना इम्प्रेस केलं आहे. आता हे सगळे एकाच सिनेमात काम करताना दिसत आहेत.

सिनेमातील काही कमतरतेबद्दल बोलायचं झालं तर काही ठिकाणी सिनेमाचा स्पीड थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. माही गिलचे काही सीन्स गरजेपक्षा जास्त लाऊड वाटतात. तुम्हाला असंही वाटेल की, माही गिल आणि ऋषीला या वयात शाळेत मुलं कसं काय दाखवलं आहे. काही ठिकाणी तर हे जास्त वाटतं. हा सिनेमा एक मजेदार अनुभव आहे. तुम्ही सिनेमा एकदा पहायला हवा. आम्ही या सिनेमाला 3 स्टार देत आहोत.