दूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाने अनेक प्रसिध्द व्यक्तींचा बळी घेतला आहे. लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांच्या निधनानंतर आता मीडिया क्षेत्रातून आणखी एक धक्का बसला आहे. दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कनुप्रिया या प्रसिद्ध अँकर तर होत्याच, पण त्या एक उत्तम अभिनेत्री देखील होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले होते. सोबतच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांची ऑक्सिजन लेवल बरीच कमी झाली होती. तसेच तापही वाढत होता. प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.