दोस्ती ग्रुपच्या वतीने शिवजयंती निमित्ताने 390 शिवचरित्राचे वाटप

कळंब (उस्मानाबाद ) : पोलीसनामा ऑनलाइन – कळंब येथील दोस्ती ग्रुपच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त लहान मुलांना महापुरुष कळावेत व वाचन संस्कृतीला बळ मिळावे म्हणून 390 शिवचरित्राचे वाटप करण्यात आले. त्यामुळे लहान मुलांना महापुरुष कसे घडले ते कळेल.

कळंब येथील दोस्ती ग्रुप नेहमीच समजापयोगी उपक्रम राबवत असतो. यावर्षी 390 व्या शिवजयंती निमित्त 390 शिवचरित्र वाटप करून आगळी वेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ रुपेश कवडे, शंकर माने, सतीश टोणगे, बाळासाहेब धस, अशोक चोंदे, श्रीराम काळे, धनंजय वाघमारे, सतीश कानगुडे, भैया बाविकर, निलेश होनराव, नाना यादव, दिनकर काळे, दीपक खोडसे, संतोष महामुनी, बालाजी साबळे, पंडित जाधव, विठ्ठल जाधव, बालाजी गिरी, नितीन लिमकर, प्रकाश मांडवकर उपस्थित होते.

कोणत्याही महापुरुषांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी यासाठी शिवचरित्र वाटप करण्यात आले, अशी माहिती उपक्रम प्रमुख संजय घुले यांनी दिली.