कोरोनापासून बचाव करायचा असल्यास ‘डबल मास्किंग’ खुपच गरजेचं, एक मास्कमधून केवळ 40 टक्केच सुरक्षितता, जाणून घ्या

लॅन्सेटने केलेल्या नवीन अभ्यासानंतर पुन्हा एकदा कोरोना आजाराच्या प्रसारावर वाद विवाद झाला आहे. या अभ्यासानुसार कोरोना ड्रॉप्लेट्समधून पसरत नाही तर हा एक वायू जन्य आहे, म्हणजेच तो हवेमार्फत पसरतो. या अभ्यासावर भाष्य करताना डॉ. फहीम युनूस म्हणाले की कोरोना यापैकी कोणत्याही कारणास्तव पसरत असला, तरीही दोन्ही घटनांमध्ये यापासून वाचण्यासाठी N95अथवा KN95 च्या दोन मास्कची खरेदी करा आणि नियमित बदलून मास्क घाला. जर एका आठवड्यात हा मास्क खराब झाला नाही तर त्याला रियुज करू शकता.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलैंड च्या संक्रमण आजारांच्या विभागाचे अध्यक्ष डॉ. फहीम युनूस हे पुढे लैसेन्ट स्टडी वर बोलताना म्हणाले की एयरबॉर्नचा अर्थ हा नाही की हवा दूषित आहे. एयरनबोर्नचा अर्थ असा आहे की व्हायरस हवेमध्ये पडून राहू शकतो, त्याचे अस्तित्व हवेत राहू शकते, खासकरून बंद जागेमध्ये.

मास्कच्या महानतेवर आजतक सोबत बोलताना फोर्टिस एस्कॉर्टस रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक सेठ म्हणाले, ”गेल्या एक वर्षात अशी लाट आम्ही कधीही पाहिली नाही. आपली आरोग्य व्यवस्था खूप खराब आहे. यासाठी सावधगिरी हा एकच उपाय आहे, म्ह्णून डबल मास्क वापरणे आवश्यक आहे. सिंगल मास्क उपयुक्त नाही, हा फक्त ४०% संरक्षण देतो. म्हणून पहिल्यांदा सर्जिकल मास्क घाला, नंतर कपड्याचा मास्क घाला, याप्रकारे डबल मास्क घातल्याने ९५% पर्यंत व्हायरसच्या ट्रांसमिशनला रोखले जाऊ शकते.