आरोपींनी उलगडले ऑनर किलिंगचे रहस्य, ‘या’ कारणावरून भावाने केली होती बहिणीची हत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद पोलिसांनी ऑनर किलिंगच्या अशा घटनेचा खुलासा केला आहे, ज्याबद्दल ना पोलिसांना माहिती होती आणि ना पोलिसांजवळ याबद्दल कोणतीही तक्रार होती. नागफनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडील मुलीच्या दुहेरी खूनप्रकरणी पकडलेल्या आरोपीने तुरुंगात जाण्यापूर्वी ऑनर किलिंगच्या घटनेविषयी सांगितले. ऑनर किलिंगची घटना आरोपीच्या मित्राच्या मोठ्या भावाने घडविली. चौकशीनंतर पोलिसांनी ऑनर किलिंगच्या आरोपीलाही अटक केली.

मुरादाबादच्या नागफनी येथील किसरौल दिवाण खान येथे 6 नोव्हेंबरला प्रॉपर्टी डीलर नजारत हुसेन आणि त्यांची मुलगी समरीन यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी येथे राहणारे मन्नास आणि युनूस यांना अटक केली होती. पोलीस दुहेरी हत्याकांडाच्या आरोपींची चौकशी करून जेलमध्ये टाकण्याच्या तयारीत होते. त्याआधीच या दोघांनी ऑनर किलिंगच्या घटनेबद्दलचे एक रहस्य पोलिसांना सांगितले. आरोपीने सांगितले की, त्यांच्या एका ड्रग्ज व्यसनी मित्र टिंकूचा मोठा भाऊ तारिकने आपली बहीण अक्शाची गळा आवळून हत्या केली आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची खोटी कहाणी निर्माण करून मृतदेह पुरला. आरोपीने सांगितले की, नशेत असताना मित्राने त्यांना हे रहस्य सांगितले. कोणालाही या गोष्टीची माहिती नाही. ऑनर किलिंगची ही कहाणी ऐकल्यानंतर पोलीस तपासात गुंतले.

एएसपी अनिल कुमार म्हणाले की, ज्या दिवशी आरोपीला ऑनर किलिंगच्या या घटनेबद्दल सांगितले गेले, त्याच दिवशी अक्शाचा पती इरफानने पत्नीची हत्या करून मृतदेह पुरण्याची तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांचा संशय बळावला, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोस्टमार्टम अहवालात समोर आले की, अक्शाचा मृत्यू गळा दाबून झाला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ तारिक याला अटक केली. चौकशीदरम्यान तारिकने सांगितले की, आपल्या बहिणीचे वागणे बरोबर नव्हते. अक्शाने तीन वर्षांपूर्वी मोहम्मद इरफानसोबत प्रेम विवाह केला होता. त्यांना एक मुलगादेखील आहे. या प्रेमविवाहामुळे मुलीच्या घराचे प्रचंड नाराज होते.

आरोपी भावाने सांगितले की, या प्रेमविवाहानंतर ती पुन्हा एका युवकाच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती पाटील सोडून प्रियकरासह पळून गेली. जेव्हा ती परत आली, तेव्हा स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर ती माहेरी येऊन राहू लागली. बहीण अक्शाच्या या वागण्याने त्यांना वारंवार अपमान सहन करावा लागल्याचे आरोपीने सांगितले. यामुळे संधी मिळताच त्याने अक्शाचा गळा दाबला आणि नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, अक्शाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्यानंतर बहिणीचा मृतदेह पुरण्यात आला.