नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित दुहेरी खून खटला ; एका भावाला फाशी तर दुसर्‍याला जन्मठेप

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन –  भोकर तालुक्यातील थेरबन येथील बहुचर्चित दुहेरी खून खटल्याचा निकाला आज (गुरूवारी) सुनावण्यात आला असून दोषी असणार्‍यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने एका भावाला फाशी तर दुसर्‍याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

आरोपी दिगंबर बाबुराव दासरे आणि मोहन नागोराव दासरे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. दिगंबरला फाशी तर मोहनला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. त्यांनी त्यांची विवाहीत बहिण पुजा आणि तिचा प्रियकर गोविंद विठ्ठल कराळे यांचा दि. 23 जुलै 2017 रोजी खून केला होता.
bhokar
याबाबत अधिक माहिती अशी की, दासरे भावंड त्यांची बहिण पूजा हिने दलित तरूणासोबत लग्‍न केल्यामुळे खुप रागावून होते. पुजा आणि तिचा पती गाव सोडून तेलंगणा येथे गेले होते. मात्र, दोघा भावंडांनी त्यांना विश्‍वास घेवून त्यांना लग्‍न लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना लग्‍नाच्या बहाण्याने भोकरकडे घेवून येत असताना झुडपात गळयावर विळयाने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर दोघा भावांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दूहेरी खून खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांच्या न्यायालयात चालू झाला. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांची साक्ष ग्राहय धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली तर आरोपींतर्फे मोहन जाधव यांनी बाजू मांडली. तत्कालीन तपास अधिकारी सुशिल चव्हाण (उपनिरीक्षक) आणि जमादार जाधव यांनी प्रकरण हाताळले होते. आज (गुरूवारी) न्यायालयात निकाल दिल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहाय्यक निरीक्षक सुरेश भाले आणि इतर कर्मचारी तेथे उपस्थित होते.

आरोग्य विषयक वृत्त

Loading...
You might also like