double murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून, महिलेचा मृतदेह सासवड रोडवर तर मुलाचा कात्रज परिसरात आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे (double murder in pune today) : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर (Pune Police) आणि पुणे ग्रामीण पोलिस दल (Pune Rural Police) हादरून सोडणारी घटना आज (मंगळवार) संध्याकाळी उघडकीस आली आहे. आईचा मृतदेह सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Saswad Police Station) आणि 8-10 वर्षाच्या मुलाचा सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्या अंगावर जखमा असून त्यांचा खून करून मृतदेह (double murder in pune today) फेकून दिल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तर त्यांची ब्रिझा कार (Briza car) पुणे-सातारा रोडवर (Pune-Satara Road) आढळली आहे. अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आयान शेख ((वय 8-10 अंदाजे)) Ayan abid shaikh आणि आई आलिया आबिद शेख Aliaya abid shaikh असे खून झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर भारती विद्यापीठ पोलीस bharati vidyapeeth police station गुन्हा FIR दाखल करण्याचे काम करत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयान व आबिदा हे पुण्यातील धानोरी परिसरात रहावयास होते. दरम्यान, आज सकाळी 7 सासवड-जेजुरी रोडवर असलेल्या खळद गावाजवळ एका हॉटेल शेजारी महिलेचा मृतदेह आढळून आला. सासवड पोलिसांनी (Saswad Police) माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी तात्काळ घटनेची माहिती पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते additional superintendent of police milind mohite यांना घटनेबाबत कळविले. सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास अप्पर अधीक्षक मिलींद मोहिते additional superintendent of police milind mohite यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह रूग्णालयात पाठविण्यात आला होता. महिलेच्या अंगावर ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट होता. गळयावर धारदार हत्याराने वार केलेल्या खुना दिसत होत्या. दरम्यान, घटनास्थळावर कोठेही रक्ताचे डाग नव्हते. त्यामुळे खुन हा दुसरीकडे करून मृतदेह या ठिकाणी फेकून देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते. सासवड पोलिसांनी तपासास सुरूवात केली. सासवड पोलिसांनी प्रथम खुनाचा गुन्हा दाखल करत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले होते. त्यांनी महिलेचे फोटो पुणे पोलीस आणि जिल्ह्यातील व राज्यातील पोलिसांना पाठवले होते. तिची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

 

त्याच दरम्यान सायंकाळी नवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ असणाऱ्या एका बड्या हॉटेलच्या परिसरात एका लहान मुलाचा मृतदेह असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या मुलाचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. झाले. पोलिस उपायुक्त सागर पाटील deputy commissioner of police sagar patil यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचना दिल्या.

पुणे शहर पोलिसांना (pune city police) सासवड (Saswad) येथे आज सकाळी महिलेचा मिळालेला मृतदेह आणि या मुलाचे काहीतरी कनेक्शन असल्याचे समजले.
त्यानुसार शोध सुरू केला असता महिला आणि हा मुलगा माय-लेक असल्याचे समोर आले आहे.
त्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर हे दोघे धानोरी भागातील असल्याचे समोर आले आहे.
त्याबाबत पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करत फोटो दाखवले असता त्यांनी या दोघांना ओळखले आहे.
तर हे प्रकरण सुरू असतानाच त्यांची कार पुणे-सातारा रस्त्यावरील (Pune-Satara Road) एका चित्रपट गृहजवळ आढळून आली आहे.
आता ते दोघे कोणासोबत गेले होते आणि नेमके काय झाले याचा तपास पोलिस करत आहेत.
मात्र या दोघांचा खूनकरून मृतदेह टाकून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तर माय-लेक घरातून दोन-तीन दिवसांपूर्वी फिरण्यासाठी (पिकनिक) म्हणून बाहेर पडले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आलिया Aliaya यांचे पती आबिद शेख abid shaikh हे पुण्यातील एका कंपनीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून कामाला आहेत.
दोन-तीन दिवसांपुर्वी ते झुम कारवरून ब्रिजा कार भाडयाने घेऊन पिकनिकला गेल्याची माहिती समोर आली आहे.
आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला असला तरी अद्याप अबिद शेख यांचा पत्ता लागेला नाही.
त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.
मात्र, आई आणि मुलाचा मृतेदह आढळून आल्याने शहर आणि जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Wab Title :- double murder in pune today | Murder of mother and child living in Dhanori, Pune, woman’s body found on Saswad Road while second body is found in katraj area

Ramdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही’, आठवलेंचा नाना पटोलेंना सल्ला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा