अमरावती : प्रेमप्रकरणातून Valentine’s Day दिवशीच दुहेरी हत्याकांड; जावायाकडून सासरा आणि मेहुण्याचा खून

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाईन – दोघांचेही प्रेम जुळले, परंतु दोघांचाही समाज भिन्न असल्याने युवतीच्या घरच्याकडून लग्नाला विरोध झाला. यामुळे दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पती- पत्नीप्रमाणे राहू लागले. मात्र हे तरुणीकडील मंडळींना आवडले नाही. यामुळे झालेल्या वादातून कथित जावायाने व्हॅलेंटाईन डे दिवशी (दि. 14 फेब्रुवारी) सासऱ्याची व मेहुण्याची धारदार शस्त्राने हत्या केली. तर यात आजे सासरेही गंभीर जखमी झाला आहे. कुरळपुर्णा येथे ही घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी पत्नीला घेऊन पसार झाला आहे.

बंडू विश्वनाथ साबळे (तरुणीचे वडील) ,धनंजय बंडू साबळे (भाऊ) असे हत्या झालेल्यांची नावे आहेत. विश्वनाथ साबळे (आजोबा) हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मयत बंडू साबळे यांची पत्नी मीरा साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवि सुरेश पर्वतकर (23, रा. महाविर काॅलनी अमरावती) याच्यावर चांदूर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याची कथित पत्नी हे दोघेही अमरावती येथे राहत होते. तेथे राहत असतानाच दोघांचेही प्रेम जुळले. दोघेही दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु युवतीच्या घरच्यांकडून या दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न होतच राहिला. काही दिवसांनंतर युवती कडील मंडळींनी तिला आपल्या घरी कुरळ पूर्णा (ता. चांदूर बाजार) येथे घेऊन आले. त्यानंतर तिला परत आरोपीकडे जाऊ दिले नाही. दरम्यान व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आरोपी कथित पत्नीला घ्यायला कुरळपूर्णा येथे आला.

यावेळी युवतीकडील मंडळींनी आरोपीला, आधीच लिहून ठेवलेल्या घटोस्फोटाच्या मुद्रांकावर स्वाक्षरीसाठी दबाव आणला. परंतु दबाला बळी न पडता आरोपी कथित पत्नीला बळजबरीने घेऊन जाऊ लागला. त्यावेळी आरोपी व युवतीचे वडील, भाऊ, आजोबा यांच्यात वाद झाला. आरोपीने युवतीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याने तिचे आजोबा, वडील व भाऊ हे तिघे दुचाकीला अडवले. दरम्यान आरोपी व युवतीकडील तिघांमध्ये जुंपली. यावरून आरोपीने आपल्याजवळील धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला केला. यात युवतीचे वडील बंडू साबळे, भाऊ धनंजय साबळे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. आजोबा विश्वनाथ साबळे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळावरून आरोपी कथित पत्नीला फरार झाला. चांदूर बाजार पोलीस फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.