जागतिक डाऊन सिंड्रोम डे : ‘ही’ मुलंही बनू शकतात स्वावलंबी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या बाळाचा डाऊन सिंड्रोम आजार मुळात पालकांना समजून घेण्यात खूप उशीर होतो. या समस्येशी सामना कसा करायचा आदी तणावाने ते ग्रासतात. जर योग्यपद्धतीने मुलाच्या या आजाराला पालक सामोरे गेले तर त्याची तीव्रता कित्येक पटीने कमी करता येऊ शकते. यासाठी युगांडातील आठ वर्षांच्या शयानेची कहाणी खरंच मार्गदर्शक ठरू शकते.

डाऊन सिंड्रोमचं निश्चित वय सांगता येणार नाही. जास्त वयात गरोदरपणा हे याचं मुख्य कारण समजलं जायचं. मात्र आता ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांच्या मुलं डाऊन सिंड्रोम असण्याची ८० टक्के प्रकरणं दिसून येतात. हा आनुवंशिक आजार असला तरी आनुवंशिक घटक कारणीभूत असलेली फक्त १ टक्के प्रकरणं आहेत.

योग्य वेळेत थेरेपी मिळाल्यास डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलांच्या विकासाला प्रोत्साहन मिळतं आणि त्यांच्यातील सामाजिक आणि बौद्धिक कौशल्यही वाढतं. उपचारानं अशा मुलांचं आयुष्यमान वाढवणं, तर थेरेपीनं त्यांच्या आयुष्यमान सुधारणं हे उद्दिष्ट असतं. सध्या रिजनरेटिव्ह मेडिसीन आणि सेल बेस थेरेपी विविध आजारांवर उपचारासाठी लक्षणीय ठरत आहे. डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलांना सुरुवातीच्या टप्प्यात सेल बेस थेरेपी दिल्यानं त्यांच्यातील समस्येची लक्षणं काही प्रमाणात कमी होत असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे.

युगांडातील ८ वर्षांचा शयानेला डाऊन सिंड्रोम असल्याचं त्याच्या जन्मानंतर कळलं. त्याच्या वयाच्या मुलांशी तसंच कुटुंबातील इतर सदस्यांशी संवाद साधताना खूप अडचणी येत होत्या. शयानेला स्वत:ची काळजी घेता येत नव्हती. शिवाय तो स्लो लर्नरही होता. शयानेला रोजच्या कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागेल, याची चिंता त्याच्या पालकांना होती. मात्र शयानेच्या पालकांनाही अपेक्षित नव्हता, असा बदल शयानेमध्ये योग्य औषधोपचार आणि शयानेच्या जिद्दीमुळे शक्य झालं.

शयानेवर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, न्यूरोरिहॅब्लिटॅशन सह तीन टप्प्यात सेल बेसड् थेरपी घेतली. या दोन्ही उपचारांचा शयानेवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. शयाने आता जे काही सांगितलं जातं ते तो करतो. याशिवाय कौशल्यावर आधारित कार्यही तो करतो. त्याच्यात आता एकाग्रताही वाढली आहे. शयाने त्याची दैनंदिन कार्य स्वत करेल अशी आम्हाला आशा आहे. आणि तो स्वावलंबी बनेल. शयानेला नियमित तपासणी करण्यास सांगण्यात आलं आहे, याशिवाय तो घरी परतल्यानंतरही त्याला रिहॅब्लिटॅशन प्रोग्रॅम सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.