Dr Abdul Qadeer Khan Died | पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादिर खान यांचे कोरोनाने निधन

रावळपिंडी : वृत्तसंस्था – Dr Abdul Qadeer Khan Died | पाकिस्तान (Pakistan) च्या अणू कार्यक्रमाचे जनक आणि शास्त्रज्ञ (Nuclear scientist) डॉ. अब्दुल कादिर खान यांचे निधन (Dr Abdul Qadeer Khan Died) झाले आहे. 85 वर्षांच्या डॉ. खान यांना 26 ऑगस्टला रिसर्च लॅबोरॅटरिज हॉस्पिटलमध्ये कोविडचा संसर्ग झाल्याने दाखल केले होते.

प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटरवर ठेवले
प्रकृती खालावल्याने त्यांना रावळपिंडी येथील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाकिस्तानी मीडियानुसार, संसर्ग वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. (Dr Abdul Qadeer Khan Died)

भोपाळमध्ये झाला होता जन्म
डॉ. कादिर यांचा जन्म अविभाजित भारतातील भोपाळ शहरात झाला होता. 1947 मध्ये विभाजनानंतर पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर डॉ. खान संपूर्ण कुटुंबासह पाकिस्तानात गेले होते.

अणू क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत
व्यवसायाने इंजिनियर असलेले खान एक दशकापेक्षा जास्त काळापर्यंत अणूबॉम्ब तंत्रज्ञान, मिसाईल बनवण्यासाठी यूरेनियम संवर्धन, मिसाईलसाठी लागणारी उपकरणे आणि पार्टच्या व्यापारात काम केले होते.

युरोपमध्ये केले अनेक वर्ष काम
युरोपमध्ये अनेक वर्ष अणू उर्जा क्षेत्रात अभ्यास आणि काम केलेल्या डॉ. खान यांना मिसाईल बनवण्याची पद्धत माहिती होती. त्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी अणू तंत्रज्ञानाची माहिती लीबिया, उत्तर कोरिया आणि इराणला दिली होती. या देशांच्या अणू कार्यक्रमात त्यांचे नाव एक प्रमुख म्हणून समोर आले.

निशान-ए-इम्तियाजने सन्मानित
एकेकाळी ते पाकिस्तानातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती बनले होते. शाळांच्या भिंतींवर तसेच रस्ते आणि ठिकठिकाणी त्यांची छायाचित्रे दिसत असत. त्यांना 1996 आणि 1999 मध्ये दोन वेळा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरि सन्मान निशान-ए-इम्तियाजने सन्मानित करण्यात आले.

तंत्रज्ञान विकल्याची बाब मान्य केली होती
डॉ. खान 2004 मध्ये जागतिक अणू प्रसार स्कँडलच्या केंद्रस्थानी होते.
त्यांच्यावर अणू मटेरियलच्या प्रसाराचा आरोप झाला होता. यासाठी त्यांच्यावर पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी सुद्धा टिका केली होती.

म्हणाले…मुशर्रफ यांचा होता दबाव
टीव्हीवर प्रसारित एका संदेशात डॉ. खान यांनी इराण, उत्तर कोरिया आणि लिबियाला अणू तंत्रज्ञान विकल्याचे मान्य केले होते.
परंतु नंतर त्यांनी पुन्हा घुमजाव केले होते. 2008 मध्ये डॉ. खान यांनी ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की,
त्यांच्यावर राष्ट्रपती मुशर्रफ यांचा दबाव होता, यासाठी त्यांनी तंत्रज्ञान विकल्याबाबत म्हटले होते.

 

Web Title :- Dr Abdul Qadeer Khan Died | pakistan nuclear scientist dr abdul qadeer khan passes away at 85 in islamabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navratri Parv | नवरात्रीत जर चुकून सुटला उपवास तर घाबरू नका, ‘या’ उपायांनी कायम राहील मातेची कृपा; जाणून घ्या

Mumbai Cruise Drug Case |धक्कादायक ! सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून घेऊन गेली होती मुनमुन, NCB ने शेयर केला व्हिडीओ

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फेरा सुरुच, 10 दिवसात पेट्रोल तब्बल 2.37 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचे दर