Dr Ajay Taware-Sassoon Hospital | ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात अधीक्षक डॉ. अजय तावरेंची उचलबांगडी, तिघांना कारणे दाखवा नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr Ajay Taware-Sassoon Hospital | पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णाला उंदीर चावल्याची घटना घडली होती (Patient Bitten By Rat In ICU) . उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालावर वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी अखेर कारवाई केली आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली आहे.

सागर दिलीप रेणुसे (वय-30) या रुग्णाला 1 एप्रिल रोजी ससून हॉस्पिटलमधील आयसीयू मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्याला उंदीर चावल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. त्याच रात्री सागर याचा मृत्यू झाला होता. त्याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात दोन एप्रिल रोजी करण्यात आले. यामध्ये मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी केली. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

डॉ. म्हैसेकर यांनी या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती.
या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतर यांनी कारवाईचे पाऊल उचलले.
याप्रकरणी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना तत्काळ पदावरुन हटवण्यात आले आहे.
याशिवाय इतर तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना निलंबन का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
त्यांना यावर उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस देखील राज्य सरकारकडे करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, ससून रुग्णालयात रुग्णाला
उंदीर चावल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना पदावरुन हटविण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून, नवीन अधीक्षक नेमण्याचे आदेश रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना दिले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘पूर्वी आम्ही घास घास घासायचो, इकडे आलो तर…’, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Amol Kolhe On Ajit Pawar | 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे (Video)

Minor Girl Rape Case Pune | पुणे : मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार