जे इतरांना जमलं नाही ते करून दाखवलं ! राष्ट्रवादीच्या ‘या’ 2 खासदारांचा देशातील ‘टॉप 5 परफॉर्मर’मध्ये समावेश, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशातील टॉप फाईव्ह खासदरांमध्ये पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. या तीन खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारल आहेत. यांच्यानंतर सुभाष भामरे (धुळे), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) आणि बिद्युत महतो (जमशेदपूर) या खासदारांचा समावेश आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=352642842367840&id=160062410681750

पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील अपडेटसची 31 मे पर्यंतची दखल संस्थेने घेतली असल्याची माहिती परिवर्तन संस्थेच्या अध्यक्षा अंकिता अभ्यंकर, समन्वयक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 212 प्रश्न लोकसभेत उपस्थित केले आहेत. तर धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी 202 आणि शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील 202 प्रश्न उपस्थित केले आहेत.

मध्य प्रदेशातील मंदसौर लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांनी 198 प्रश्न उपस्थित केले आहेत. तर झारखंडमधील जमशेदपूर मतदारसंघातील भाजपचे खासदार बिद्युत महतो यांनी 195 प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदरांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रीया सुळे, सुभाष भामरे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेचे मुंबई उत्तर पूर्वमधील खासदार गजानन किर्तीकर यांनी 195 प्रश्न विचारले असून त्यांचा चौथा क्रमांक लागतो.

तर पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 194 प्रश्न विचारून पाचवा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशातील पहिल्या पाच खासदारांमध्य राष्ट्रवादीचे दोन तर भाजपचे तीन खासदार आहेत. महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह मध्ये राष्ट्रवादीचे दोन भाजपचा एक, आणि शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश आहे.