Dr. Amol Kolhe In PCMC | खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘एन्ट्री’नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ‘अ‍ॅक्शन’मध्ये

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा (PCMC General meeting) बुधवारी पार पडली. महापलिकेच्या सर्वसाधारण सभेला शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe In PCMC) यांनी हजेरी लावली. डॉ. कोल्हे (Dr. Amol Kolhe In PCMC) यांनी प्रेक्षकांच्या गॅलरीत (audience gallery) बसून सभेचे कामकाज पाहिले. त्यामुळे सत्ताधारी भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे (Shivsena) नगरसेवक (Corporator) आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. स्मार्ट सिटी भ्रष्टाचार, रस्ते खोदाई, आयुक्तांची कार्यपद्धती या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार टीका केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा अनेक महिन्यानंतर ऑफलाईन झाली. सभेत कसे कामकाज चालते, हे पाण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe In PCMC) उपस्थित राहिले. दुपारी सव्वा दोनला पक्षाचे खासदार स्वत: लॉबीमध्ये असल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. महिला सुरक्षा, स्मार्ट सिटी भ्रष्टाचार (Smart City Corruption), रस्ते खोदाई या सर्व गोष्टीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार टीका केली. स्थायी समितीचे (Standing Committee) माजी अध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane), माजी महापौर योगेश बहल (Yogesh Behl) यांनी शहरातील विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्याचे भाजपच्या नगरसेवकांनी कौतुक करत त्यांना उपरोधक टोला लगावला.

 

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या भाषणानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. खासदार उपस्थित असल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी देखील जोरदार भाषणे केली. याशिवाय भाजपच्या नगरसेवकांनी देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला. यावर बोलताना, खासदारांना दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकांचा प्रयत्न सुरु आहे, हे ठीक आहे. पण भाजपचे नगरसेवकांनी देखील खासदारांसमोर जोरजोरात भाषण करत त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, अशा कानपिचक्या कलाटे यांनी दिल्या. (Dr. Amol Kolhe In PCMC)

 

Web Title : Dr. Amol Kolhe In PCMC | Pimpri-Chinchwad Municipal Corporation corporator in ‘action’ after MP Dr. Amol Kolhe’s entry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, म्हणाले -‘फडणवीस आणि गडकरी यांच्यात 36 चा आकडा’

Cryptocurrency | 500 रुपयांत सुद्धा Bitcoin मध्ये करू शकता खरेदी, विक्रमी स्तरावर आहे दर

Actress Ananya Pandey | अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी NCB पथक दाखल; चौकशीसाठी दिलं समन्स