Dr. Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे यांनी उलगडले एकांतवासाचे गुपित, व्हिडिओ जारी करत म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार (NCP MP) डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे मागील काही दिवसांपासून एकांतवासात गेले होते. डॉ. अमोल कोल्हे एकांतवासात गेल्यानंतर अनेक चर्चा, तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, आता स्वत: डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी आपण एकांतवासात का गेलो याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यूट्यूबला (YouTube) एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी सांगितले, मी एकांतवासात 7 नोव्हेंबर रोजी जाण्याबाबत पोस्ट केली. त्यानंतर तर्कवितर्क आणि चार्चा लंगू लागल्या. माझ्या एकांतवासाविषयी अनेक चर्चा रंगल्यानंतर मला असं वाटलं की, आपण स्वत:च उलगडा करावा. अमोल कोल्हे म्हणाले, एकांतवासात जाण्यामागे कुठलाही राजकीय हेतू (Political motive) या पाठीमागे नव्हता. मानसिक थकवा (Mental fatigue) स्वीकराणं ही काळाची गरज असं आहे असं म्हणत कोल्हे यांनी एकांतवासाला नकारात्मक दृष्टीने पाहिलं गेल्याबद्दल खंत व्यक्त केली.

 

अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) म्हणाले, माझ्या एकांतवासाबाबत अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. काहींनी तर राजकीय पक्षांतराबाबत देखील भाष्य केलं. मात्र माझ्या एकांतवासात जाण्याचं कारण होत मानसिक विश्रांतीचं (Mental relaxation), असं ते म्हणाले. आपण व्यक्त कुठं व्हायचं हा प्रश्न उभारतो आणि मग साचलेपण येत. त्यातून मधुमेह (Diabetes), हृदयविकार (heart disease) असे अनेक विकार समोर येतात. त्यामुळे व्यक्त होणं, मोकळं होणं महत्त्वाचं आहे. व्यक्त होणं हे जीवंतपणाचं लक्षण असल्याचे कोल्हे म्हणाले.

 

मानसिक थकवा स्वीकरणं गरजेचं आहे. मी या एकांतवासात काय शिकलो हे नक्कीच तुम्हाला कळेल. कुणी एकांतवासात जातोय म्हणजे त्याला नकारात्मक का घ्यायचं. त्याला सकारात्मक पद्धतीनं का घेऊ शकत नाहीत. मला या एकांतवासात एक व्यक्त होण्याचं माध्यम सापडलं असं कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी सांगितले.

 

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले होते अमोल कोल्हे?

डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी 7 नोव्हेंबर रोजी फेसबुक पोस्ट (Facebook post) केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय.. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!! फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, असे कोल्हे म्हणाले होते.

 

 

Web Title :- Dr. Amol Kolhe | ncp mp dr amol kolhe you tube video facebook post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा