“स्वराज्यरक्षक संभाजी” सुरुच राहणार ; निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शिरुरमधून लोकसभेचे उमेदवार  अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांची झी मराठी या वाहनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खासगी वाहिनीवर सुरु असल्यास तिचे प्रक्षेपण थांबविण्यात येणार नाही, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

दुरदर्शन या सरकारी वाहिनीवर उमेदवाराची भूमिका असलेल्या मालिका दाखविण्यास बंदी आहे. परंतू खासगी वाहिनीवर उमेदवाराची भूमिका असेलली मालिका सुरु असल्यास ती बंद करता येणार नाही. असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. असे त्यांनी सांगितले.

ही मालिका सुरु असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने या मालिकेचे प्रक्षेपण तत्काळ बंद करण्यात यावे. तसेच या मालिकेवर दंडात्मक कारवाई करुन त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी करण्यात करण्यात आली.  त्यावर या मागणीचा विचार करता, पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना विचारले असता, ते म्हणाले की, या मालिकेचे प्रक्षेपण बंद करण्यात येणार नाही, कारण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केवळ सरकारी वाहिनी असलेल्या दूरदर्शनवरील मालिकांवरच बंदी घालता येते.  तेव्हा नवलकिशोर राम यांनी सध्याच्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मालिकेवर कोणतीच कारवाई करता येणार नसल्याचं म्हंटलं आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरला तरी, यात आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होत नसल्याचे सांगण्यात आले, ही तक्रार कोणी केली होती हे सांगणे मात्र नवलकिशोर राम यांनी टाळले.