Dr Amol Kolhe | ‘हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या’; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Dr Amol Kolhe | पुण्यात विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांनी कंगना राणावतच्या विधानाचं समर्थन केलं. तसेच राजकीय भूमिकांवरही भाष्य केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि अभिनेता अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. यानंतर आता राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डाॅ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

त्यावेळी बोलताना अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) म्हणाले, कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही.
मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.

 

पुढे ते म्हणाले, मानवता हीच त्यापलिकडची गोष्ट आहे, वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण, परंपरा आहे.
एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसदैवं कुटुंबकमला तिलांजली देता.
असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

काय म्हणाले होते विक्रम गोखले?

 

सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.
तरुणाईला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे.
या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आलीय. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही.
असे गोखले यांनी म्हटले आहे. तर, कंगनाने देशाच्या स्वातंत्रतेबद्दल केलेल्या विधानाचेही त्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे, ते सध्या सोशल मिडियावर ट्रोल होत आहेत.

 

तसेच, आज मराठी माणूस भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे.
अशी टीका विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी महाआघाडी सरकारवर केली.
हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

 

Web Title : Dr Amol Kolhe | would you say saffron blood your patient hospital ncp mp dr amol kolhe actor vikram gokhale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | ‘सर्व प्रकारच्या गुन्ह्याशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचं नाव जोडलं आहे’ – चंद्रकांत पाटील

CBI ची मोठी कारवाई ! इंजिनियर आणि त्याची पत्नी बनवत होते मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ

Trupti Khamkar | अभिनेत्री तृप्ती खामकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘झोंबिवली’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला