डॉ. आनंद तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर उद्या निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा एल्गार परिषद आणि कोरेगाव भिमा प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. तर सर्व पत्रांमध्ये कॉमरेड आनंद असा उल्लेख केलेला आहे. पत्रांमध्ये कॉमरेड प्रकाश असा उल्लेख असेल तर तो प्रकाश आंबेडकर असा समजणार का असा युक्तीवाद असा युक्तिवाद आनंद तेलतुंबडे यांच्या वतीने बाजू मांडताना एड. रोहन नहार यांनी केला. गुरुवारी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीनावर विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यांच्या अटकपुर्व जामीनावर शुक्रवारी निर्णय होणार आहे.

यावेळी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, भारतीय कम्यूनिस्ट पार्टीने कोरेगाव भीमा दंगलीचा वापर देशात अराजक माजवण्यासाठी करा, असा ठराव केला होता. त्यांनी चळवळीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त माओवाद्यांना काही सूचना केल्या होत्या सर्व संशयित एकमेकांच्या संपर्कात होते. त्यासोबतच देश विरोधी कारवाईमध्ये ते सहभागी असल्याचे त्यांच्या ई-मेल संभाषणातून समोर आले आहे.

या पत्रातील उल्लेख असलेला मनोज कोण आहे. त्याच्याकडून किती कुरिअर पाठवण्यात आले आहे. त्यांना पैसे कुठून मिळाले. याच्या तपासासाठी आनंद तेलतुंबडे यांच्याकडे चौकशी करायची असल्याने त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र अ‍ॅड. नहार यांनी बचाव पक्षाच्या वतीने बाजू मांडताना आरोप फेटाळून लावले. तर सर्व पत्रांमध्ये कॉम्र्रेड यांचे केवळ पहिले नाव देण्यात आले आहे. तेथे आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. त्यामुळे उद्या कॉमरेड प्रकाश असे नाव आल्यास पोलीस ते प्रकाश आंबेडकर आहेत असे म्हणणार का असा युक्तीवाद त्यांनी केला.