इस्त्रोचे अध्यक्ष ‘रॉकेटमॅन’ के. सिवन यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)चे अध्यक्ष  आणि रॉकेटमॅन के सिवन यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तामिळनाडु सरकारच्या वतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या तामिळनाडुच्या नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो. सुवर्ण पदक आणि ५ लाख रुपये असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.

इस्त्रोने पाठविलेल्या चांद्रयान २ ने मजल दरमजल करीत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी इस्त्रोच्या अध्यक्षांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सिवन यांची कहाणी मोठी संघर्षपूर्ण आहे. तामिळनाडुच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातील एका शेतकऱ्याचे पुत्र कैलाशवडीवू सिवन यांनी एका शासकीय शाळेतून तामिळ माध्यमातून शिक्षण घेतले. सिवन यांनी १९८० मध्ये मद्रास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून त्यांनी एयरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. २००६ मध्ये आयआयटी बॉम्बेतून त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी केली. पीएचडी मिळविणारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिले आहेत. त्यांची बहीण आणि भाऊ गरिबीच्या कारणामुळे उच्च शिक्षण पूर्ण करु शकले नाहीत. ते कॉलेजमध्ये जात असतानाही वडिलांना शेतात मदत करीत असत. बीएससीला त्यांना गणितात १०० पैकी १०० गुण मिळाले आणि त्यांचे विचार बदलले.

१९८२ मध्ये त्यांनी इस्त्रोमध्ये प्रवेश केला. ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये संचालक होते. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियसेबल लाँच व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिले. सिवन यांना इस्त्रोचे रॉकेटमॅन असे संबोधले जाते. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी इस्त्रोचा पदभार सांभाळला. त्यांच्या अध्यक्षतेखाली चांद्रयान २ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –