डाॅ. अस्तिक कुमार पांडे बीडचे नवे जिल्हाधिकारी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाने आज (बुधवारी) 18 वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अस्तिक कुमार पांडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून जे.एस. पापळकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पापळकर हे सध्या चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. बीडचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची माहिती आणि तंत्रज्ञान (मुंबई) येथे संचालक म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली आहे. डॉ. अस्तिक कुमार पांडे हे अकोला येथे कार्यरत असताना त्यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबविल्या होत्या. बदल्या झालेल्या इतर सनदी अधिकार्‍यांची यादी खाली जोडण्यात आली आहे.
Loading...
You might also like