इंदापूरमध्ये आ. भरणे, पाटील, मानेंसह अनेकांनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर यांचे (६ डिसेंबर) ६३ व्या महापरिनिर्वाण दिनी इंदापूर तालुक्यातील इंदापूर, अंथुर्णे, शेळगाव, व परिसरातील विविध ठीकाणी माण्यवरांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्रीशरण पंचशिलाने अभिवादन केले.

इंदापूर शहरातील नगरपरिषदेसमोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळ्यास राज्याचे माजी सहकारमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सकाळी ठीक नऊ वाजता पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी प्रा. बाळासाहेब मखरे यांनी त्रीशरण पंचशिल म्हटले. यावेळी भाजप ता. अध्यक्ष नानासाहेब शेंडे, कैलास कदम, पांडूरंग तात्या शिंदे, संदीपान कडवळे,जगदीश मोहिते, सागर गानबोटे यांचेसह मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.

इंदापूर तालुक्यातील मौजे अंथुर्णे येथिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी सकाळी ९:३० वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर मोहळ विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार यशवंत माने यांनी त्यांचे राहते गावी इंदापूर तालुक्यातील मौजे शेळगाव येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

इंदापूर शहरातील आंबेडकरनगर बुद्ध विहार येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीमेस मुख्याध्यापक शशिकांत मखरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर नगरसेविका राजश्री मखरे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करन्यात आले. व प्रा.बाळासाहेब मखरे यांनी त्रीशरण पंचशिल म्हटले व बाबासाहेबांना अभिवादन केले. तर इंदापूर-टेंभुर्णी नाका येथिल शाहु, फुले, आंबेडकर मुलांचे वस्तीगृृह येथे आर पी आय तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे यांचे हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर नितीन झेंडे यांनी त्रीशरण पंचशिल म्हटले व बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राजु घाडगे, महेंद्र कडवळे, सुधाकर ढगे यांचेसह नागरिक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.