Pune Collector Dr. Rajesh Deshmukh Marathi | मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : Pune Collector Dr. Rajesh Deshmukh | महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार शासकीय कामकाज १०० टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व विभागांनी मराठी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी विविध उपक्रम राबवत अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Pune Collector Dr. Rajesh Deshmukh On Marathi) यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मराठी भाषा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे (Pune RDC Himmat Kharade), उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर (Amrut Natekar), उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे (Rahul Gawade), माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर (Dr Purushottam Patodkar), शिक्षणाधिकारी (माध्य) सुनंदा वाखारे (Sunanda Wakhare), पुणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी मंजिरी देशपांडे (Manjiri Deshpande), शिक्षणाधिकारी (प्राथ.) रमेश चव्हाण (Ramesh Chavan), शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे (Suresh Raddiwale), पोलीस अधिक्षक कार्यालयाचे विकास जाधव (Vikas Jadhav), पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) रविकिरण घोडके (Ravikiran Ghodke), भाषा संचालनालयाचे अधीक्षक सुनिल शिरसाट (Sunil Shirsath) उपस्थित होते. (Pune Collector Dr. Rajesh Deshmukh On Marathi)

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, राज्य शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर ज्याप्रमाणे बंधनकारक आहे त्याप्रमाणेच त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने मराठी भाषेला उत्तेजन देण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा दिनानिमित्त दरवर्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक कार्यालयात मराठी भाषा अधिकारी नेमण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयात मराठी भाषेतील व्यवहारासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास कळवाव्यात. (Pune Collector Dr. Rajesh Deshmukh)

उपजिल्हाधिकारी नाटेकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा समिती गठीत करण्यात आली असून त्या
समितीमध्ये कला, साहित्य, संस्कृती आणि प्रकाशने या क्षेत्रात काम करणाऱ्या व जिल्ह्यात राहणाऱ्या व्यक्तींमधून
दोन प्रतिनिधींची नावे नामनिर्देशित करण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या प्रसारासाठी शासकीय ग्रंथालयाने आयोजित केलेला ग्रंथप्रदर्शनाचा उपक्रम खूपच चांगला असल्याचे ते म्हणाले.

माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने महाराष्ट्राच्या राज्यगीताच्या स्टँडी लावाव्यात.
यामुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या अन्य भाषिकांनाही राज्यगीत माहिती होईल.
तसेच १ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत, मराठीतील लुप्त होत असलेले शब्द आणि त्याचे चित्र व माहिती
असे पुस्तक तयार केल्यास पुणे जिल्ह्याचा वेगळा उपक्रम होईल. या पुस्तकाचा पुढच्या पिढीला चांगला उपयोग होईल.

यावेळी विविध शासकीय कार्यालयांनी मराठी भाषा संवर्धनासाठी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
तसेच शासकीय कार्यालयात दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

Web Title :- Dr. Babasaheb Ambedkar Jayant | Exhibition ‘Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar and Indian Films’ organized on behalf of Vanchit Bahujan Aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gulabrao Patil | ‘तेच ते बोलून आम्हाला छळण्यापेक्षा नव्याने पक्ष बांधणी करा’, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सल्ला

TDM Marathi Movie | जब जिंदगी झंड होती है, तो पुना, बंबईही याद आती है…! ‘टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज (Video)

Maharashtra Politics News | ‘राष्ट्रहितासाठी राष्ट्रवादी भाजपसोबत येत असेल तर…’, भाजप मंत्र्यांचं मोठ विधान