बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा दावा खोटा : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर केला होता. हा आरोप खोटा असून, बाबासाहेबांच्या स्मारकाची उंची कमी केली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ठाण्यातील रिपाइंच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab4a2866-c78d-11e8-8978-0b2556b68bc4′]

नियोजित स्मारकात मुख्य पुतळ्याची उंची ३५० फुट ठरवण्यात आली होती. मात्र आता चबुतरा १०० फूट आणि मुख्य पुतळ्याची उंची २५० फूट करण्यात आल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता. तीन दिवसांपूर्वी इंदू मिलच्या नियोजित जागेवर आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे सादरीकरण करण्यात आले होते. सरकारने स्मारकाची उंची कमी केल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल असा इशाराही आनंदराज आंबेडकर यांनी दिला होता. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी बाबासाहेबांच्या स्मारकाची उंची कमी होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने, या वादावर अखेर पडदा पडला आहे.

‘मेक इन इंडिया’ला बाधा आणणारे ‘गुंडाराज’ संपवा

ठाणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे राज्य पुरोगामी विचारांवर पुढे चालले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तर त्यासाठी माझी तयारी असेल. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या नेत्यांचे पुतळे काँग्रेसने देशभर उभारले तर काही नेत्यांनी त्यांच्या वडीलांचेही पुतळे उभारले. परंतु, ज्या नेत्याने देशाची राज्यघटना लिहिली, त्या नेत्याचा मात्र त्यांना विसर पडला. गीता, बायबल, कुराणपेक्षा राज्यघटना आम्हाला प्रिय आहे. या राज्यघटनेमुळे आमचे अस्तित्व आहे आणि वंचितांना न्याय मिळतो आहे.

[amazon_link asins=’B071WPQJPY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80769a83-c78e-11e8-8dd2-816782c818c4′]

देशाची राजकीय व्यवस्था आणि ओळखही या राज्यघटनेमुळेच आहे. बाबासाहेबांचे स्मारक मतांसाठी नव्हे तर मानवंदनेसाठी उभारण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. भिमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असून त्यामुळे एकाही व्यक्तीवर गुन्हा राहणार नाही. कायदेशीर प्रक्रियेसाठी वेळ लागतो आहे. मात्र, दिलेला शब्द पाळला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.