‘या’ तारखेपासून सुरु होतेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘गौरवगाथा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातील एक महान पर्व आहे. लवकरच या इतिहासाची ही सोनेरी पाने पुन्हा उडलगणार आहे. लवकरच सुरु होणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ वर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या महामानवाची गौरवकथा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका १८ मे म्हणजेच बुद्धपोर्णिमेपासून सुरु होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा’ प्रेरणादायी जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ वाहिनी करणार आहे. ही मालिका १८ मे रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहचवण्याच्या हेतूने ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची निर्मिती केली आहे.

या मालिकेत आदर्श आणि उत्कर्ष शिंदेने या गाण्याचे शब्द लिहले असून आदर्शच्या भारदस्त आवाजात हे गाणे रेकॉर्ड केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक होते. सर्व माणसे समान आहे. कोणी उच्च किंवा नीच नाही, अशी त्यांची ठाम धारणा होती. व्यवस्थेच शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार याबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. अद्वितीय बुद्धिमत्त, जागतिक दर्जाची विद्वता, क्रांतीकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रचंड वाचन आणि अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन… अशा अनेक गुणविशेषांसह ‘भीमजी रामजी आंबेडकर’यांचा प्रवास हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ इथपर्यंत झाला.

https://www.instagram.com/p/BwOhaQ1JxIi/

 

मराठी अभिनेता सागर देशमुख मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरने याआधी अनेक वेगवेगळ्या भूमिकेत काम केले आहे. याविषयी सांगताना सागर म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचे कर्तुत्व खरच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत. एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय असं म्हटले तर ते वावगं ठरणार नाही. ‘

https://www.instagram.com/p/BvjGQ_PniTA/