गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं ‘वादग्रस्त’ विधान, म्हणाले – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवं होतं स्वतंत्र दलितस्थान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत धक्कादायक विधान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांसाठी स्वतंत्र दलितस्थान बनवण्याचा विचार होता परंतु भारतातील जनता एकजूट राहिली. लोकसभा नागरिकत्व सुधारणा कायदा पारित करुन घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव गोव्याच्या विधानसभेमध्ये सादर करण्यात आला होता. यावर बोलताना आजगावकर यांनी हे वक्तव्य केले.

फाळणीच्या वेळी मुस्लिम नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात निघून गेले आणि पाकिस्तानचा जन्म झाला. मात्र हिंदुस्तान हिंदू राष्ट्र बनले नाही. आज काही लोक हिंदू राष्ट्राची चर्चा करतात. हिंदुंमध्ये कॅथॉलिक, हिंदु, मुस्लिम, दलित अशा सर्व समुदायातील लोकांचा समावेश होता. दलितांसाठी स्वतंत्र दलितस्थान असेल असे म्हणले होते, परंतु आज सर्वजण एकत्र आहेत असे आजगावकर म्हणाले.

आजगावकर म्हणाले की जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आंबेडकरांना आम्हाला संविधान दिले, ज्यात हिंदु, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वांचा समावेश आहे हा देश महान असेल तर यात या सर्वांचे योगदान आहे.

मनोहर आजगावकर हे गोवा विधानसभेमध्ये पेडणे मतदारसंघाचे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पूर्वीश्रमीचे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते असलेले आजगावकर यांनी काही काळापूर्वी भाजपात प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.