पूर्व हवेलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन  –   भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पूर्व हवेलीतील थेऊर लोणी काळभोर कुंजीरवाडी येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले थेऊर येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे सरपंच शीतल काकडे यांनी पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच या महामानवास ग्रामविकास अधिकारी कोळी यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले तर लोणी काळभोर येथे सरपंच राजाराम काळभोर व उपसरपंच ज्योती काळभोर यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वि जयंती अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आली कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बध असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, राहुल कांबळे, संतोष काकडे, गौतमी कांबळे, गणेश गावडे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, पोलिस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, पोलिस नाईक गणेश कर्चे, अरोग्य सेवक प्रशांत बिराजदार, भारती सोनवणे, पोलिस पाटील रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते.

कोरोना महामारी संदर्भात आपत्कालीन बैठकीचे आयोजन करून गावातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्या संदर्भात चर्चा झाली गावाअंतर्गत सर्वेक्षण करून रुग्ण संख्या नियंत्रनात आणली जाणार आहे तसेच लसीकरण कार्यक्रम अधिक कार्यक्षमतेने राबविण्यात येणार आहे.