Dr. Bhagwat Karad | विमानातील प्रोटोकॉल तोडत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याने वाचवले प्रवाशाचे प्राण; पीएम मोदींनी दिली शब्बासकी

पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Bhagwat Karad | डॉक्टर म्हणजे देवाचं रुप असतो असं म्हणतात. याची प्रचिती नुकतीच दिल्ली-मुंबई विमान प्रवासात आली. सोमवारी दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका व्यक्तीची प्रकृती बिघडली. त्यावेळी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) हे देखील त्याच विमानातून प्रवास करत होते. विमानातील क्रू मेंबर्सने उद्घोषणा करुन ऑन बोर्ड कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केली. त्यावेळी डॉ कराड यांनी लगेच त्या प्रवाशाजवळ जाऊन त्याला प्रथमोपचार देत त्याचा जीव वाचवला. दरम्यान, प्रसंगावधान राखत डॉ कराड यांनी केलेल्या कामाची दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यांनी घेतली आहे.

डॉ कराड रुग्णाला मदत करत असतानाचा फोटो इंडिगो एअरलाइन्सने (indian airlines) ट्विट करत त्याचं कौतुक केलं आहे. तसेच गरजेच्या वेळेस धावून आल्याबद्दल कराड यांचे आभार मानले आहेत. इंडिगोने (indigo ) ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, आम्ही आपले ऋणी आहोत. आपल्या कर्तव्याबद्दल नेहमीच दक्ष असणाऱ्या या केंद्रीय मंत्र्याचं आम्ही कौतुक करतो. डॉक्टर कराड यांनी एका प्रवाशाला मदत करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली तयारी ही खरोखरच प्रेरणादायी आहे. दरम्यान, इंडिगोचे हे ट्विट कोट करुन पंतप्रधान मोदींनीही रिट्विट केले. ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केलेलं काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्याला रिप्लाय देत डॉ कराड यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. त्याचबरोबर तुम्ही दाखवलेल्या ‘सेव आणि समर्पण’ या मार्गावरुनच मी जनतेची सेवा करत आहे, असंही त्यांनी म्हंटले आहे.

Pune Crime | भरधाव BMW ची दुभाजकाला धडक ! दोन्ही पाय अडकलेल्या अल्पवयीन चालकाची अग्निशमन दलाच्या जवानाने केली सुटका

डॉ कराड (Dr. Bhagwat Karad) म्हणाले रक्तदाब (blood pressure) कमी झाल्याने प्रवाशाला फार घाम (Low BP) येत होता. मी त्याला तत्काळ कपडे काढण्यास सांगितले. त्याची छाती चोळली तसेच ग्लुकोज दिल्यानंतर ३० मिनिटांनी या प्रवाशाला बरं वाटलं. केंद्रीय मंत्र्यांसाठी विमान प्रवासात प्रोटोकॉल (flight protocol) असतो मात्र, प्रकृती खराब झालेल्या या प्रवाशाची मदत करण्यासाठी कराड यांनी हा प्रोटोकॉल तोडत त्याचे प्राण वाचवले.

डॉ. भागवत किशनराव कराड हे मूळचे लातूरचे आहेत.
एका शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म १६ जुलै १९५६ रोजी झाले. त्यांनी एमबीबीएस, एम.एस.(जनरल सर्जरी), एम. सीएच(पेडियाट्रीक) या पदव्यांचं शिक्षण घेतलं आहे. डॉ. कराड हे बालरोग शल्यचिकित्सक आहेत.

हे देखील वाचा

High Court | परवानगी शिवाय दुसरा विवाह करणारा शिक्षेस पात्र, जाणून घ्या हायकोर्टानं नेमकं काय म्हंटलंय

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Dr. Bhagwat Karad | Dr. bhagwat karad doctor turned union minister helps passenger mid air what pm said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update