Dr. Bharati Pawar | मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध; राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dr. Bharati Pawar | राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) काल (गुरुवारी) महाराष्ट्रातील कोरोनावरील सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मास्क (Mask) वापरणं देखील ऐच्छिक करण्यात आलं आहे. सरकारच्या निर्णयानंतर राज्यातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी विरोध दर्शविला आहे.

 

”कोरोनाचं संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे मास्कचा वापर करावा लागेल,” असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ”मास्क वापरण्याच्या सूचना या केंद्र सरकारने (Central Government) दिल्या आहेत. केंद्राने मास्क बंदी केली नाही. दिल्ली सरकारने देखील मास्क घालणे बंधनकारक केले आहे.” असं त्या म्हणाल्या.

 

दरम्यान, पुढे बोलताना राज्यमंत्री पवार म्हणाल्या की, ”महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) हा निर्णय घेण्यापूर्वी शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. राज्य सरकारने मास्क बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी कोणता रिसर्च केला ?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Dr. Bharati Pawar | union minister of state for health dr. bharti pawar says opposition to mask release

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा