Dr. Chanda Nimbkar – Monica Mohite | डॉ. चंदा निंबकर व मोनिका मोहिते यांना ‘शारदा शक्ति’तर्फे पुरस्कार जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन : Dr. Chanda Nimbkar – Monica Mohite | ‘शक्ति’ या महिलांच्या राष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे ‘शक्ति स्थापना दिवस’ यंदा रविवार २६ मार्च २०२३ रोजी पुण्यात साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. चंदा निंबकर (Dr. Chanda Nimbkar, Director Of Nimbkar Agricultural Research Institute) यांना ‘स्त्री २०२०’ या पुरस्काराने गौरवले जाईल. तसेच कोल्हापूरच्या सेंद्रिय शेती तज्ञ मोनिका मोहिते (Monika Mohite, Organic Farming Expert Kolhapur) यांना ‘शक्ति प्रेरणा’ पुरस्काराने गौरविले जाणार आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र व सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (Dr. Chanda Nimbkar – Monica Mohite)

रविवार दि. २६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता पुण्याच्या स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल. ‘शक्ति’च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सुधा तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात विज्ञानभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे (Dr. Shekhar Mande) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. (Dr. Chanda Nimbkar – Monica Mohite)

फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. चंदा निंबकर या उच्चविभूषित असून त्यांचे वडील पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेळ्या मेंढ्या पालन क्षेत्रात त्यांनी पायाभूत काम उभे केले आहे. पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांनी ‘नारी सुवर्णा’ ही नवीन जात निर्माण करून शेळी मेंढी पालन हा व्यवसाय किफायतशीर व्हावा यासाठी मार्ग आखून दिला. नारी सुवर्णा जातीच्या मेंढ्यांचा प्रसार करणे, भारतातील वेगवेगळ्या शेतकरी समूहांना, मेंढपाळ महिलांना प्रशिक्षण देणे आणि यामध्ये अजून संशोधन करणे यासाठी डॉ. चंदा निंबकर कार्यरत आहेत.

कोल्हापूरच्या सेंद्रिय शेती तज्ञ सौ. मोनिका मोहिते या उच्चविभूषित असून त्यांनी त्यांचे ४० एकर शेत जमिनीत गेली १५ वर्षे नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करून त्याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना दिले. अनेक सेंद्रिय उत्पादनांची विक्री आणि निर्यात त्या करतात. कोल्हापूरच्या अंबाप फाटा येथील मोहिते अग्रो फार्मच्या माध्यमातून त्या काम करतात.

२००३ मध्ये केरळ येथे विज्ञानभारतीच्या प्रेरणेने ‘शक्ति’चे काम सुरु झाले. भारतातील अनेक राज्यांमध्ये ‘शक्ति’
च्या माध्यमातून हजारो महिला कार्यरत आहेत. महाराष्ट्रात २००६ पासून ‘शारदा शक्ति’ या नामे संस्थेचे काम सुरु
झाले. महिला आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान : प्रचार व प्रसार, पर्यावरण व शिक्षण या क्षेत्रात संस्थेमार्फत काम केले जाते.
महिला बचत गट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार महिला, गृहिणी, कष्टकरी महिला, उच्चशिक्षित,
प्रबुद्ध महिला, वस्ती विभागातील महिला व मुले, सर्वसामान्य नागरिक या सर्वांसाठी ‘शारदा शक्ति’
विविध व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे, स्पर्धा, राष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे यांचे आयोजन करते.

Web Title :-  Dr. Chanda Nimbkar – Monica Mohite | Dr. Chanda Nimbkar and Monika Mohite were awarded by ‘Sharda Shakti’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress MP Rahul Gandhi | वादग्रस्त विधान करणं राहुल गांधीना पडलं महागात, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Udayanraje Bhosale | ‘तर मिशीच काय… भुवया पण काढून टाकेन आणि…’, उदयनराजेंचे चॅलेंज शिवेंद्रराजे स्वीकारणार का? (व्हिडिओ)

Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | पुण्याच्या विकासाचे आव्हान राज्य सरकारने स्वीकारले; मोठ्या प्रकल्पांना गती मिळावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे