Dr. D.Y. पाटील महाविद्यालयात रस्ता सुरक्षा माह निमित्त Online व्याख्यान

आकुर्डी : पोलीसनाम ऑनलाईन – डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे, डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान साजरा होत असलेल्या रस्ता सुरक्षा माह निमित्त मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ दादा पाटील, प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांनी केले होते. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रस्त्यावर वाहन चालवताना आपण कोण-कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे छायाचित्रे, ध्वनीफीत आणि चित्रफितीच्या माध्यमातून समजावून सांगितले.

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी कार्यक्रम घेण्याचा हेतू, उद्देश सांगितला. कार्यक्रम समन्वयक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. मुकेश तिवारी, रासेयो आकुर्डी विभाग समन्वयक डॉ. मिनल भोसले, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. खालिद शेख, प्रा.भागवत देशमुख, प्रा. हेमल ढगे, प्रा. सचिन चेडे, प्रा. भागवत ढेसले आणि तांत्रिक काम प्रा. चेतन सरवदे यांनी पाहिले. सूत्रसंचालन प्रा. नवनाथ राठोड यांनी केले तर आभार प्रा. गणेश फुंदे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक ऑनलाईन उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी काम केले.