डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणेला फटकारले

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येसंबंधी सतत माध्यमांसमोर येवून भाष्य करणाऱ्या तपास यंत्रणांची मुंबई हायकोर्टाने कानउघडणी केली. तपास यंत्रणांची कान उघाडणी करताना मुंबई हायकोर्टाने दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही खडसावले आहे. या दोन्ही कुटुंबीयांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरफायदा घेवू नये, माध्यमांसमोर जावून या प्रकरणाचे पुरावे उघड करू नये, अशी समज त्यांना दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
[amazon_link asins=’B0073C7IIK,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’acd2ee65-b1bd-11e8-bfe8-c18e44c3fe8f’]

तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर पुरावे उघड करणे हे आम्हाला पसंत नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने त्यांना फटकारले आहे. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असताना विशेष तपास पथक (एसआयटी) सतत माध्यमांसमोर का जात आहे. हे योग्य नाही, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडे बोल सुनावले.

इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका, तुमचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा, असे निर्देश कॉ. गोविंत पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीला हायकोर्टाने दिले. दरम्यान, दाभोलकर हत्या प्रकरणाच्या सुनावणीला १० ऑक्टोबरपर्यंत हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त 

जाहिरात