डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : कळसकर याला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला आज (मंगळवार) दुपारी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यादंडाधिकारी एस. एम. सय्यद यांनी १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e453680-b027-11e8-ab6d-a1a8f8ae02be’]

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी शरद कळसकर हा दुसरा प्रत्यक्ष मारेकरी असून त्यानेच दाभोळकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या आहेत. तसेच तो शस्त्र तयार करण्यात आणि हाताळण्यात पारंगत आहे व शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यातही तो सहभागी होता असे सांगत आरोपीला 14 दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयात केली होती.

सरकारी वकिलाच्या युक्तिवादाला उत्तर देताना आरोपीचे वकील अॅड धर्मराज यांनी आतापर्यंतच्या तपासात सीबीआयला सचिन अंदुरेच्या 14 दिवसाच्या कोठडीत देखील गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि आणि वाहन हस्तगत करता आले नाही. त्यामुळे कळसकरला न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी मागणी केली.
[amazon_link asins=’B07417987C,B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13a42e0b-b027-11e8-b8d7-17174a1963f6′]

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश सय्यद यांनी शरद कळसकर याला १० सप्टेंबरपर्यत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Please Subscribe Us On You Tube
Policenama News