Dr. Deepak Sawant Accident | राज्यात नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरूच, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला आज सकाळी अपघात (Dr. Deepak Sawant Accident) झाला आहे. या अपघातात सावंत जखमी झाले आहे. हा अपघात काशिमीरा भागात झाला असून त्यांच्या गाडीला एका डंपरने पाठिमागून जोरात (Dr. Deepak Sawant Accident) धडक दिली. यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

डॉ. दीपक सावंत हे आज सकाळी पालघरला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी जात होते. काशिमीरा येथे त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक (Dr. Deepak Sawant Accident) दिली. त्यांच्या मानेला दुखापत झाली आहे. तर कारचे मोठे नुकसान झाले. अपघातात जखमी झालेल्या सावंत यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अॅम्ब्युलन्समधून तातडीने रुग्णालयात पाठवले.

दरम्यान, राज्यात नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांचा अपघात झाला होता. रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने उडवलं. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (NCP Dhananjay Munde) यांच्या कारचा देखील अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या छातीला मार लागला, आणि आता माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

 

Web Title :- Dr. Deepak Sawant Accident | accident to former health minister
dr deepak sawant injured car was hit by a dumper

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा