Corona Vaccination : ‘भारताला केवळ 51 कोटी लोकांना लस देण्याची आवश्यकता, हे 2-3 महिन्यात शक्य’ – एक्सपर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य सेवांवर वाईट परिणाम झाला आहे. दुसर्‍या लाटेत लोकांचे होत असलेले मृत्यू पाहता तिसरी लाट सुद्धा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशावेळी नारायणा हेल्थचे चेयरपर्सन डॉ. देवी शेट्टी यांचे म्हणणे आहे की, पुढील दोन-तीन महिन्यात व्यापक व्हॅक्सीनेशन अभियानच प्रभावी आणि आर्थिक मार्ग आहे ज्याद्वारे भारत स्वत:ला तिसर्‍या लाटेच्या दुष्परिणामापासून वाचवू शकतो.

इंडिया टुडे टीव्हीचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांच्या सोबतच्या मुलाखतीमध्ये डॉ. शेट्टी यांनी म्हटले की, भारताला केवळ 51 कोटी लोकांना व्हॅक्सीनेट करण्याची आवश्यकता आहे आणि हे सहजपणे पुढील दोन-तीन महिन्यात केले जाऊ शकते. त्यांनी म्हटले की, भारतात कोरोना महामारीचा प्रकोप थांबवणे अवघड नाही. यासाठी स्वस्त आणि वेगवान व्हॅक्सीनेशन अभियान हाच उपाय आहे. हे सिद्ध झाले आहे की, व्हॅक्सीन प्रभावी आहे. आपल्याला 18 वर्षावरील सर्व लोकांना व्हॅक्सीन देण्याची आवश्यकता आहे.

डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता दूर करावी
याशिवाय, त्यांनी म्हटले कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या लाटेपासून बचाव करण्यासाठी भारताने लवकरात लवकर डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता दूर केली पाहिजे, जेणेकरून कोरोना रूग्णांची योग्य देखभाल करता येईल. त्यांनी म्हटले की, देखरेखीमुळे कोरोनाच्या मृत्यूंमध्ये घट होईल.

व्हॅक्सीनेशनमध्ये 70 हजार कोटींपेक्षा कमी खर्च
त्यांनी म्हटले की, आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, आपला देश खुप मोठा आहे आणि लोकसंख्या खुपच जास्त आहे. परंतु आपल्याकडे आवश्यक स्त्रोतांची कमतरता आहे. एका दिवसाच्या लॉकडाऊनमुळे देशाचे दहा हाजार कोटी पेक्षा जास्त नुकसान होते. आपल्याला केवळ 51 कोटी लोकांचे व्हॅक्सीन करण्याची आवश्यकता आहे. 13 कोटी लोकांना अगोदरच व्हॅक्सीन दिली आहे (किमान एक डोस). सध्या आपण मुले आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकसंख्येला कमी करू शकतो कारण आतापर्यंत या वयोगटासाठी व्हॅक्सीन अधिकृत नाही. अशावेळी केवळ 51 कोटी लोक शिल्लक राहतात ज्यांना व्हॅक्सीनचे दोन डोस द्यायचे आहेत. हे करण्यासाठी 70 हजार कोटीपेक्षा कमी खर्च येईल.