‘डॉ. आयुषी भय्यू महाराजांच्या मृत्यूला जबाबदार, निनावी पत्र पोलिसांच्या हाती

इंदूर : वृत्तसंस्था

दिवंगत राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांनी आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. आपल्याला ताण-तणाव सहन होत नसल्यामुळे आत्महत्या करत असून आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिठ्ठी देखील मिळून आली होती. मात्र महाराजांच्या आत्महत्ये संदर्भात एक नवीन निनावी पत्र पोलिसांच्या हाती लागलं असून, भैय्यू महाराज यांच्या मृत्यूसाठी त्यांची पत्नी डाॅ. आयुषी हीच कारणीभूत असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. सदरचे पत्र भैय्यू महाराजांच्या एका विश्वासू सेवकाने पाठवल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. आपण भैय्यू महाराज यांच्या मृत्यूचं गूढ जाणतो आहोत. मात्र आपल्या जीवाला धोका असल्याने आपण स्वतःचं नाव जाहीर करु शकत नसल्याचे या पत्रात सांगण्यात आलं आहे.

[amazon_link asins=’B00WXYP6XM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a598eb32-7b81-11e8-8ff8-5ff0ab397d5e’]

ज्या दिवशी डाॅ.आयुषी यांच्या सोबत महाराजांचा विवाह झाला. त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात कलह सुरू झाला. त्यांची दुसरी पत्नी आयुषीने पहिल्यांदा त्यांना परिवारापासून तोडले. त्यानंतर आश्रमात भाऊ, काकाला बोलावून घेतले. एवढेच नाही तर त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहूपासून देखील त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचेही या पत्रात म्हटलं आहे.
महाराजांच्या पहिल्या पत्नीबद्दल चर्चा जरी केली तरी आयुषीच्या रागाचा भडका उडत होता. घरामध्ये लावण्यात आलेले त्यांचे फोटो देखील हटवले होते. महाराजांना कुहूशी बोलू दिलं जात नव्हतं. त्यामुळे महाराजांना आपल्या नातेवाईकांना गपचीप बोलावं लागत होते. आयुषीचा भाऊ अभिनव आणि काका उमेश शर्मा आश्रमाकडून वेतनही घेऊ लागले होते. या सर्व कारणांमुळे मागील दोन वर्षापासून महाराज खूप तणावाखाली होते. डाॅ. आयुषीसोबत विवाह झाल्यानंतर ते एकलकोंडे पडले होते. अशा प्रकरचा उल्लेख या निनावी पत्रात करण्यात आला आहे.