सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी डॉ. जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. यापुर्वी 8 आणि 15 जानेवारी रोजी राज्यातील जिल्हयांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.

राज्य शासनाने आज (31 मार्च) रोजी काढलेल्या आदेशाप्रमाणे मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची सोलापूर जिल्हयाच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 8 जानेवारी रोजी काढलेल्या आदेशामध्ये अंशतः बदल करून डॉ. आव्हाड यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.