एक्सप्रेस-वे वरील अपघातात संचेती हॉस्पिटलचे डॉ. केतन खुर्जेकर ठार,व्हॉलोच्या धडकेत २ डॉक्टर गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एक्सप्रेस वेवर व्हॉलो बसने दिलेल्या धडकेत संचेती हॉस्पिटलमधील स्पाईन सर्जन डॉ़ केतन श्रीपाद खुर्जेकर यांचा मृत्यु झाला. एक्सप्रेस वेवर रविवारी रात्री साडेदहा वाजता तळेगाव जवळ हा अपघात झाला. या अपघातात गाडीचा चालकही ठार झाला असून आणखी दोन निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.

डॉ़ केतन खुर्जेकर व अन्य दोन डॉक्टर हे मुंबईला एका मेडिकल कॉन्फरन्सला गेले होते. तेथून ते परत येत असताना त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. गाडी कडेला घेऊन चालक टायर बदलत होता. त्याला मदत करण्यासाठी डॉ. खुर्जेकर हे त्याच्या शेजारी उभे होते तर दोन डॉक्टर मागच्या बाजूला उभे होते. त्याचवेळी मुंबई बाजूकडून वेगाने व्हॉल्वो बस आली.

तिने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या या गाडीसह चौघांना उडविले. त्यात गाडीचालक व डॉ. केतन खुर्जेकर हे जागीच ठार झाले. अन्य दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

You might also like