डिबेट शोमध्ये मराठमोळ्या डॉ. लेलेंकडून बाबा रामदेव यांची बोलती बंद, म्हणाले – ‘ऐ चुप्प…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचारासंबधी अविश्वासर्हता दर्शवली होती. ॲलोपॅथी ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान असल्याचे म्हणत डॉक्टराबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रविवारी आरोग्य मंत्र्यांने झापताच रामदेव बाबांनी अ‍ॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेतल्याचे म्हटले होते. मात्र, मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अ‍ॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे. य़ावरुन आयोजित एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएचे माजी पदाधिकारी डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांना चांगलेच फैलावर घेत त्यांची बोलती बंद केली आहे.

बाबा रामदेव यांच्या अ‍ॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित एका वृत्त वाहिनीच्या डिबेट शोमध्ये डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉ. लेले अ‍ॅलोपॅथीसंदर्भात बोलताना रामदेव मध्ये- मध्येच बोलत होते. त्यावरून डॉ. लेले चांगलेच संतापले होते. ऐ चुप्प… चुप्प… असे म्हणत लेले यांनी रामदेव बाबा यांना शांत केले. त्यानंतर बाबांनीही प्रतिक्रिया देत आप कौन है.. मुझे चुप बैठानेवाले असे म्हणत उत्तर दिले. मात्र, सोशल मीडियावर डॉ. लेले यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांना समर्थन मिळत आहे. तर काहीजण डॉ. लेलेंना ट्रोलही करत आहे. पण सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत. डॉक्टर लेले हे मुंबईचे असून सध्या जनपद येथे मेडीकल प्रॅक्टीस करत आहेत. सध्या ते इंडियन मेडिकल असोसिएशनेच सरचिटणीस आहेत.

रामदेव बाबा यांचा एका टीव्ही डिबेट वेळी देखील आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांच्यासोबत वाद झाला. अ‍ॅलोपथीकडे अनेक आजारांवर काहीच उपचार नाहीत. आय़ुर्वेदामध्ये बीपी, शुगर, थायरॉईडसारख्या आजारांवर उपचार आहेत. कोरोना लसीचे 2 डोस घेवूनही हजारावर डॉक्टरांनी आपले प्राण गमावल्याचे विधान बाबा रामदेव यांनी केले आहे. यावर शर्मा यांनी कोविड सेंटरच्या लेव्हल 3 मध्ये धोतरावर जाऊन काम करून दाखवा, असे आव्हान दिले. यावर रामदेव बाबा भडकले, तुम्ही माझा कुर्ता, लंगोट काढू नका. स्वत:ला सर्व शक्तीमान समजू नका, असे बाबा रामदेव म्हणाले. रामदेव बाबांनी यानंतर ट्विट करत आयएमएला काही प्रश्न विचारले आहेत. अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते तेंव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही असा सवाल केला आहे. आयुर्वेदावर टीका करणे, शिव्या का दिल्या जातात. फार्मा कंपन्या खूप आहेत, मग डॉक्टर त्यांचे बळी का ठरत आहेत. डॉक्टर तर एका फार्मा कंपनीचा प्रतिनिधी नसतो, अशा शब्दांत रामदेव बाबांनी सवाल केले आहेत.