Dr. Madhav Godbole | निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यात 85 व्या वर्षी निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले (Dr. Madhav Godbole) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Died) झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 85 वर्षाचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती गोडबोले कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा, सून दक्षिणा, जावई महेश आणि नातवंडे आदिती, मनन, गायत्री आणि तारिणी असा त्यांचा परिवार आहे. (Retired Union Home Secretary Dr Madhav Godbole Passed Away In Pune At 85)

 

डॉ. माधव गोडबोले (Dr. Madhav Godbole) हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. 1959 साली ते भारतीय प्रशासकीय सेवेत उतरले आणि मार्च 1993 मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव आणि न्याय सचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. दरम्यान, त्याआधी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव व नगर विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. तसेच, महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मुख्य वित्तसचिव पदावर जबाबदारी सांभाळली. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते.

Web Title : Dr. Madhav Godbole | Retired Union Home Secretary Dr Madhav Godbole Passed Away In Pune At 85

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR