Dr. Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उलटतपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Narendra Dabholkar Murder Case | अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात बचाव पक्षाकडून बुधवारी (दि.15) डेक्कन पोलीस ठाण्याचे (Deccan Police Station) तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक (then Senior Police Inspector) आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मनोहर जोशी (Retired ACP Manohar Joshi) यांची उलटतपासणी (Dr. Narendra Dabholkar Murder Case) करण्यात आली. बचाव पक्षाचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर (Adv. Virendra Ichalkaranjikar) यांनी उलटतपासणीत तपासासंदर्भात प्रश्न विचारले. जोशी यांची उलटतपासणी पूर्ण झाली असून, पुढील सुनावणी 2 मार्च रोजी होणार आहे.

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर (Dr. Narendra Dabholkar Murder Case) त्यांच्या खिशातील चाव्या कोणत्या खोलीच्या किंवा कपाटाच्या होत्या हे पाहिले का? सकाळी लोंढे नावाचा पोलीस त्याठिकाणी कसा आला? त्याठिकाणी पडलेल्या गोळ्यांवर केएफ (खडकी फॅक्टरी-Khadki Factory) असा मार्क आहे, तिथं खडकी फॅक्टरीमधून गोळ्या कशा आल्या याचा तपास केला का? असा प्रश्न विचारला असता मनोहर जोशी यांनी नाही असे उत्तर दिले, अशी माहिती अॅड. इचलकरंजीकर यांनी दिली.

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर (Special Judge S.R. Navandar) कोर्टात सुरु आहे.
या प्रकरणी सचिन अंदुरे (Sachin Andure), शरद कळसकर (Sharad Kalaskar), डॉ. वीरेंद्र तावडे (Dr. Virendra Tawde),
अॅड. संजीव पुनोळकर (Adv. Sanjeev Punolkar) आणि विक्रम भावे (Vikram Bhave)
यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. यावेळी डेक्कन पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि
निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मनोहर जोशी यांची उलटतपासणी घेण्यात आली.

 

Web Title : – Dr. Narendra Dabholkar Murder Case | cross examination the then senior inspector of deccan in the narendra dabholkar murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बलात्कारातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक झाले बाऊन्स; 65 वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना