Dr. Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी गृहखात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Narendra Dabholkar Murder Case | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृहखात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष नोंदविण्यात आली. गृहखात्याचे माजी सचिव शिरीष मोहोळ यांनी या प्रकरणात मंगळवारी न्यायालयात साक्ष दिली. यावेळी बचाव पक्षाकडून त्यांची उलटतपासणीदेखील घेण्यात आली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्याच्या आदेशावर गृहखात्याचे तत्कालीन उपसचिव शिरीष मोहोळ यांनी स्वाक्षरी केली होती. (Dr. Narendra Dabholkar Murder Case)

 

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि
विक्रम भावे यांच्या विरोधात यूएपीए कायद्यासह भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) वतीने विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी शिरीष मोहोळ यांची साक्ष नोंदवली आहे.
या प्रकरणातील आरोपींवर ‘यूएपीए’ अन्वये आरोप ठेवण्यासाठी ‘सीबीआय’ने तत्कालीन मुख्य सचिवांना पत्र दिले होते.
या पत्रासोबत जोडलेले आरोपींचे जबाब अभ्यासून या संदर्भातील आदेशाला मान्यता दिल्याचे तत्कालीन उपसचिव मोहोळ
यांनी न्यायालयात स्पष्ट केले. डॉ. दाभोलकर खटल्याची पुढील सुनावणी 13 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष, संस्थापक आणि समाज सुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर
यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात ओंकारेश्वर मंदिर परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
18 ऑगस्ट 2018 रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी प्रथम सचिन प्रकाशराव अंदुरे याला अटक केली होती.
त्यानंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. (Dr. Narendra Dabholkar Murder Case)

 

Web Title :- Dr. Narendra Dabholkar Murder Case | retired deputy secretary of home affairs record witness in court narendra dabholkar murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Swati Deval | ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘या’ अभिनेत्रीची सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत दिली माहिती

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी